पोळ्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश
शिऊर / प्रतिनिधी
वर्षभर
शेतात राबून काबाडकष्ट करणाऱ्या बैलाच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी
पोळा सणाला विशेष महत्व आहे , आपल्या लाडक्या सर्जा- राजाला समजून गावातून
त्यांची मिरवणूक काढण्यात येते याच माध्यमातून काही सामाजिक संदेश देखील
देण्यात आले, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका,
वृक्षलागवड काळाची गरज, प्लास्टिकचा वापर टाळा आदी सामाजिक संदेश देत काही
मनोरंजनात्मक व विनोदी टिपण्या देखील बैलावर लिहिल्या होत्या, गाणे व
चित्रपटांची नावे लिहून बैलजोडी सजविण्यात आली होती. फुगे, घागरमाळासह
विविध रंग रेखाटन्यात आले होते.
दरम्यान शिऊर गावात पोळा उत्साहात साजरा करण्यात आला
