शिऊर येथील रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार
संतप्त लोकप्रतिनिधींनी दुकानदाराला धरले धारेवर
शिऊर / सौरभ लाखे
शिऊर
येथील काही रेशन दुकानदार आपला मनमानी कारभार करत असून याचा फटका सामान्य
नागरिकांना बसत आहे, रेशन दुकानदारांच्या "हम करेसो ओ कायद्या" या
प्रकाराला वैतागून ग्रामस्थानी आपले गाऱ्हाणे अखेर शिऊर येथील
लोकप्रातिनिधीकडे मांडले लोकप्रतिनिधींनी तात्काळ दखल घेत रेशन दुकानावर
प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून रेशन धारकांच्या अडचणी समजावून घेत रेशन
दुकानदाराला चांगलेच धारेवर धरले. नागरिकांना शासकीय योजनेप्रमाणे स्वस्त
धान्य व रॉकेल मिळावे यासाठी स्वस्त धान्य दुकानाची सुरुवात केलेली आहे या
माध्यमातून मजूर व गोरगरीब जनतेला अल्पदामात धान्य व केरोसीन उपलब्ध करून
दिले जाते , मात्र शिऊर गावातील काही रेशन दुकानदार आपला मनमानी कारभार करत
असून ग्राहकांना अर्वाच्य भाषा वापरून तर महिलांना एकेरी शब्द बोलत
अपमानास्पद वागणूक देत आहे , दि. २१ रोजी शिऊर येथील एका रेशनदुकानावर
धान्य व केरोसीन खरेदीसाठी ग्रामस्थानी सकाळीच रीघ लावली होती मात्र दहा
वाजून गेले तरी रेशनदुकानदार धान्य वितरित करण्यासाठी न आल्याने
ग्रामस्थांचा रोष वाढला त्यांनी माजी उपसरपंच गिरिष भावसार यांच्याकडे आपले
गाऱ्हाणे मांडले भावसार यांनी तात्काळ राशनदुकानावर येऊन संबंधित दुकान
चालकाला फोनवरून संपर्क साधला मात्र दुकानदाराचा फोन बंद असल्याने त्यांनी
त्याचे घर गाठले व त्याला दुकानात बोलविले तोपर्यंत ग्राहकांची मोठी गर्दी
जमा झाली होती.
गिरीष भावसार यांनी या बाबीची गंभीर
दखल घेऊन सरपंच नितीन चुडीवाल यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना याची
महिती दिली. सरपंच नितीन चुडीवाल ,उपसरपंच जाकिर सैययद्, संजय
जाधव, पोलीस पाटील सुमील देशमुख अकबरभाई, सुशील देशमुख यांनी देखील स्वस्त धान्य दुकानदाराला जाब
विचारत चांगलेच फैलावर घेतले व पुन्हा तक्रार आल्यास कारवाईचा इशारा देत
स्वस्त धान्य वाटप करण्यास सूचना दिल्या.
"शिऊर गावातील काही राशनदुकानाबाबत सातत्याने तक्रारी येत असून या ग्राहकांना अपमानस्पद वागणूक तसेच चढ्या दराने धान्याची व केरोसीन विक्रीसोबतच अवैद्य पद्धतीने धान्य विक्री होत असल्याचा तक्रारी प्राप्त होत असून हे स्वस्त धान्य दुकान महिला बचत गट कडे देण्याचा प्रस्ताव ठेवणार असून अश्या तक्रारी पुन्हा प्राप्त झाल्यास पंचनामा करून कार्यवाही करणार असल्याचे माजी उपसरपंच गिरीष भावसार यांनी सांगितले.
