ग्रामीण भागात चोर्यांचे सत्र तिन दिवसांत आठ चोर्या,
गस्त वाढविण्याची मागणी.
गारज
व परिसरात चोरट्यांनी घरफोडी , दुकान चोरीचा सपाटाच लावला असून मनूर व
गारज येथील घरफोडी होऊन तिन दिवसही उलटले नसताना आज पहाटे पाच वाजता गारज
येथील राहूल पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या तेजस कृषी सेवा केंद्र फोडून
चोरट्यांनी तिन दिवसात आठ ठिकाणी हात साफ करून शिऊर पोलीसांना मोठे
आव्हान दिले आहे दिवसांमध्ये गारज व परिसरातील मनूर सह ग्रामीण भागात
चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे .
दरम्यान आज पहाटे
राहूल पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या तेजस क्रुषी सेवा दुकानात चोरी करतांना
चोरटे सि.सि.टिव्ही फुटेजमध्ये आले आहेत चारचाकी मध्ये आलेल्या तिन चोरटे
हे उच्च शिक्षित असल्याचे दिसून येते आहे
गारज
व परिसरातील मनूर येथे चोऱ्या व घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून
गुरुवारी रात्री दोन ते अडिच वाजेच्या सुमारास एकच रात्री सहा ठिकाणी
घरफोड्या करीत मनूर येथिल सुरेश सर्जेराव साळुंके यांच्या घरातील तिन तोळे
सोने व चार हजार रुपये रोख रक्कम ,मानिक काशिनाथ पवार यांच्याघरातील आडीच
तोळे सोने व व पंचविस हजार रोकड चोरट्यांनी लंपास केले
गारज
येथील प्रकाश जगन्नाथ सुर्यवंशी हे वास्तुशांती निमित्ताने औरंगाबाद
येथे गेलेले होते यांच्या घरातील नथ व जोडवे असे एकूण बारा हजार रुपये
किमतीचे सोन्याची चोरी झाली.
विषेश म्हणजे बाहेरगावी गेलेल्या घरांना चोरट्यांनी लक्ष बनवले चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरांमध्ये प्रवेश केला
घटनेची
माहिती मिळताच शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय
फराटे,स.पो.नि.गणेश जामदार ,बिट जमादार रामचंद्र जाधव यांनी घटनास्थळी दाखल
होउन पंचनामा केला