नामस्मरणात सर्व साधनांची फलनिष्पती – पंढरीनाथ महाराज पगार
शिऊर / प्रतिनिधी
           मानवी जीवनातील दु:ख मुक्तीसाठी भगवंताचे  नामस्मरण महत्वाचे असून सर्वश्रेष्ट शक्ती व सर्व साधनांची फलनिष्पती नामसाधनेत असल्याचे प्रतिपादन संत शिवाई संस्थानचे अध्यक्ष, भागवताचार्य  ह..पंढरीनाथ महाराज पगार यांनी केले. शिऊर येथील श्री संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिरात गेल्या नऊ महिन्यापासून सुरु असलेल्या श्रीविष्णू सहस्रनाम ग्रंथाचे विवरण व विवेचनाची सांगता दि ०४ रोजी झाली यावेळी आयोजित कीर्तनात पंढरीनाथ महाराज बोलत होते.
      “भाग्यवंता हेची काम, मापे नाम वैखरी” या अभंगावर विवेचन करतांना पगार महाराज म्हणाले कि, भौतिकतेच्या अतिरेकाने  झालेले परिणाम जगाला कळत असून आता जगाची रती सत्संगाकडे वाढत आहे. आत्मीयतेने नामस्मरण करणाऱ्यासोबत देव असतो त्यामुळे नामस्मरण करणारा भाग्यवान ठरतो. विष्णूसहस्रनामामुळे जीवनात अध्यामिक ऊर्जा मिळत असल्याचे देखील यावेळी महाराज म्हणाले.
श्री विष्णूसहस्रनाम ग्रंथाच्या सांगतेनिमित्त भगवान श्री विष्णूचे एक हजार तुळशीपत्र अर्पण करून पूजन करण्यात आले.या पूजेत शेकडो भाविक सहभागी झाले होते.
                       सत्संगामुळे आनंद :- बंडोपंत लाखेस्वामी
गेल्या दोन वर्षापासून शिऊर येथील संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिरात विविध ग्रंथ विवेचन करण्यात आले असून या दैनंदिन सत्संगामुळे मिळणारा आनंद वेगळाच असतो विष्णूसहस्रनामावली मुळे भगवंताचे नाम सामान्य जणापर्यंत पोहचत असून कलियुगात नामयज्ञ महत्वाचे असल्याचे असे स्वामींचे वंशज ह.भ.प बंडोपंत महाराज लाखेस्वामी यावेळी म्हणाले.
         अमृतानुभव, हरिपाठ, तुकोबारायांचा गाथा, निळोबा महाराजांचा गाथा आदी ग्रंथाचे विवेचन दैनंदिन प्रवचनमालेतून बंडोपंत लाखेस्वामी यांनी केले. यावेळी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, जे.के.जाधव, भागीनाथ मगर, पोपटराव जाधव, रामभाऊ जाधव, बबनराव जाधव, सरपंच नितीन चुडीवाल, माणिकचंद चुडीवाल, चंद्रशेखर खांडगौरे, गिरीश भावसार, ज्ञानेश्वर महाराज मधाने, पवन पाठक, प्रभाकर महाराज चन्ने,‍ सारंगधर महाराज भोपळे, कृष्णास्वामी, प्रभाकर आढाव,संजय जाधव, यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वितेसाठी बंडोपंत लाखेस्वामी, प्रभाकर तुपे, रामभाऊ ठेंगडे, लक्ष्मण ठेंगडे, गोविंदराव जाधव, अभिनंदन भावसार, भास्करराव भावसार, शिवराम जाधव, रंगनाथ आढाव, बाबुराव शेळके, हरिभाऊ सूर्यवंशी , विश्वनाथ जाधव, रघुनाथ शिंदे, साहेबराव जाधव, आदींनी परिश्रम घेतले.

 
Top