cctv साठी प्रतिमा परिणाम

शिऊर जिल्हा परिषद प्रशाला आता सीसीटीव्ही च्या निगराणीखाली
माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार , गैरप्रकाराला बसणार आळा, सीसीटीव्ही असणारी वैजापूर तालुक्यात पहिली शाळा 

शिऊर / सौरभ लाखे 

     शैक्षणिक गुणवत्तेसह भौतिक सुविधांच्या द्रूष्टचक्रात अडकलेल्या शिऊर येथील जिल्हा परिषद प्रशालेचे रुपडे पालटण्याचा चंग प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांनी बांधल्यानंतर त्यांनीच वर्गणी जमा केल्याने प्रशालेत व आवारात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. वैजापूर तालुक्यात सीसीटीव्ही च्या निगराणीखाली असलेली वैजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेची ही पहिलीच शाळा ठरली आहे. 
         शिऊर येथील जिल्हा परिषद प्रशालेची गेल्या सात वर्षांपासून या ना त्या कारणाने अधोगती होत गेली पर्यायाने प्रशालेची शैक्षणिक गुणवत्ता पुरती ढासळली त्यात शिक्षकांचे रिक्त पदे , शिक्षकांची अंतर्गत गटबाजी , लोकप्रतिनिधींचा अयशस्वी पाठपुरावा व अधिकाऱ्यांचे घुमजाव या सर्व प्रकारामुळे परिस्थिती जैसे थे राहत असल्याने प्रशालेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला व  कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना , समिती व्यतिरिक्त निस्वार्थपणे अविरत  सकारात्मक कार्य  करण्याचा निर्धार करत कार्य करण्यास सुरुवात केली.
          प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांच्या व्हाटस अप ग्रुप वर गुणवत्ता वाढीसह भौतिक सुविधेच्या बाबतीत चर्चा झडत गेली व त्यातुन कार्यरत शिक्षकांची अध्ययन पद्धती बदल करणे, किरकोळ कारणासाठी बंद असलेले इ लर्निंग लॅब चालू करणे, शाळेतील समस्याबाबत विद्यार्थ्यांची भाषणे , प्रशालेच्या कारभाराबाबत शिक्षकांची निबंध लिखाण आदी उपक्रम तात्काळ राबवण्याचे तसेच विद्यार्थ्यांसाठी वाचन कार्यक्रम व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे आदी विषय हाताळण्यात आले व यातील काही विषय राबविण्यात देखील आले.
        विद्यार्थ्यांना ज्ञान अध्ययनासाठी गुरुकुल म्हणून  संबोधल्या जाणाऱ्या या प्रशालेचे आवार मदयपींचा अड्डा बनला होता शिऊर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या आवारात झिंगाटवीर दारू रिचवत असल्याचा धक्कादायक प्रकार व प्रशालेतील साहित्य चोरीच्या घटना वाढीस लागल्याचा मुद्दा ऐरणीवर आला
           प्रशालेच्या आवारात होणाऱ्या उपद्रवावर उपाय म्हणून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला व या प्रशालेने आपल्याला घडविले असून  प्रशालेचा माजी विद्यार्थी या भावनेतून आर्थिक मदत करण्याचे आवाहन व्हाट्सअप ग्रुपवर करण्यात आले आणि बघता बघता कित्येक माजी विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही साठी आर्थिक योगदानाची आकडेवारी जाहीर केली. व जवळपास पन्नास हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने आपली देणगी रक्कम जमा केली. माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ४५ हजार रुपये देणगी निधी संकलित केला व शाळेचे रुपडेच पालटले, या निधीतून या शिऊर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या आवारात व वर्गखोल्यात आठ  सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून  वर्गखोल्यासह प्रशालेचे आवार आता सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असल्याने उपद्रव थांबणार आहे.

यांनी केली आर्थिक मदत
प्रशालेत सीसीटीव्ही बसविण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर नितीन चुडीवाल, सुभाषचंद्र जाधव, गिरीश भावसार, गोकुळ आहेर, नंदकिशोर जाधव, विजय बनकर, नवनाथ आढाव, भास्कर जाधव, संजय {अण्णा} जाधव, डॉ विजय महाजन, डाँ.कूष्णा कवाडे, शिवा महाले, महेंद्र देशमूख, सुखदेव काळे, डॉ.सोपान डघळे, संतोष भागवत, रामेश्वर जाधव, सुधीर देशमुख, संजय जाधव सर  ,बी.एम.आहेर,भारत दांडगे, जालिंदर जाधव, आबासाहेब जाधव. गणेश शिनगारे,ज्ञानेश्वर गायकवाड, बाळु पवार, महावीर अन्नदाते, रईस शेख, तुकाराम जाधव, अयुब शहा, गोरख जाधव ,पवन पाठक,अनिल गायकवाड, चंद्रशेखर जाधव, दत्तू सूर्यवंशी,  महेंद्र चुडीवाल,   सुनील बैरागी, प्रवीण पैठणपगारे,योगेश दंडगव्हाळ,अशोक साळुंके, रामदास जाधव, शिवाजी दरेकर, प्रसाद लाखे, विशाल सूर्यवंशी, अनिल पैठणपगारे,  शरद जानोसे, प्रशांत झाल्टे, योगेश खांडगौरे ,आजिनाथ गुजर, योगेश जोगदंड, आदींनी आर्थिक रक्कम दिली. तर बाळा जाधव, गौतम पगारे यांनी प्रशालेचे प्रवेशद्वाराची रंगरंगोटी केली. सुनील शिरोडे, प्रा.चंद्रशेखर देशमुख, नितीन भावसार, योगेश राऊत,संजय पगारे, सौरभ लाखे यांचेही सीसीटीव्ही कामी योगदान लाभले.
रिक्त जागा व शौचालयाचा प्रश्न आता रडारवर

शिऊर येथील जिल्हा परिषद प्रशालेचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने गट-तट, हेवे दावे, वैचारिक मतभेद व राजकारण बाजूला सारून माजी विद्यार्थी या नात्याने एकत्रित आलेल्यानी आपला निधी संकलित करून सीसीटीव्ही बसविले असून आता प्रशालेतील रिक्त असलेल्या विषय शिक्षकांच्या जागेसह शिपाई, लिपिक व राजपत्रित मुख्याध्यापक हे पदे भरण्यात यावीत यासाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत तर प्रशालेच्या आवारात प्रशस्त शौचालय बांधकाम करण्याचा मानस आहे. प्रशालेच्या भिंतीला रंगरंगोटी करून “बोलक्या भिंती” साकारण्यात येणार असून पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था माजी विद्यार्थी पुढाकार घेऊन करणार आहे.
 
Top