“शिऊर येथील प्रशालेतील
रिक्त जागा तत्काळ भरा , अन्यथा व्यापक आंदोलन"
लोकप्रतिनिधीसह शिऊर
जि.प प्रशालेच्या माजी विद्यार्थ्याचे अध्यक्षा डोणगावकर , सीइओ आर्दड, विभागीय अप्पर आयुक्त टाकसाळे यांना
निवेदन




शिऊर / सौरभ लाखे
शिऊर जिल्हा परिषद प्रशालेतील पाच वर्षांपासून
असलेल्या महत्वाच्या विषय
शिक्षकांसह इतर
रिक्त जागा भरण्यासाठी सर्व स्तराहुन वारंवार पाठपुरावा करण्यात येऊन देखील जिल्हा परिषद प्रशासनाने
त्याकडे दुर्लक्ष केले
असल्याने पालकांसह
माजी विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध
संताप व्यक्त केला आहे. १५ ऑगस्ट पर्यंत किमान इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक मिळावे अन्यथा
औरंगाबाद जिल्हा परिषदेतच विद्यार्थ्यांची शाळा भरविण्यात येऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा निर्वाणीचा इशारा
निवेदनातून दिला आहे.
वैजापूर पंचायत समिती सभापती इंदुबाई
सोनवणे, जि.प सदस्य प्रा.रमेश बोरनारे, जि.प सदस्या सपना पवार यांच्यासह गोकुळ आहेर, वसंत पवार, संजय
जाधव, संतोष भागवत, शिवा महाले, संजय पगारे, सौरभ लाखे यांनी दि ११ रोजी औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी पा. डोणगावकर यांची भेट घेऊन याबाबत निवेदन
देण्यात आले.
प्रशालेत पाच वर्षांपासून रिक्त असलेल्या इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक
शास्र या विषयाच्या शिक्षकांसह, मुख्याध्यापक, लिपिक, पर्यवेक्षक आणि शिपायांच्या रिक्त जागा स्वातंत्र्य दिना पर्यंत भरण्यात
याव्यात अशी मागणी करण्यात आली.
एकेकाळी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वोत्तम शैक्षणिक
गुणवत्ता असलेली शाळा म्हणून शिऊर येथील जिल्हा
परिषद प्रशालेचा नावलौकीक होता मात्र २०१० पासून प्रशालेला मरणयातना सुरू झाल्या . जिल्हा परिषदेच्या ढिसाळ
कारभाराचा फटका येथेही
बसला आणि
शिक्षकांच्या रिक्त जागेमुळे गुणवत्तेला उतरती कळा लागली. गणित, विज्ञान, इंग्रजी या
महत्वाच्या विषयाला विषय शिक्षक नसल्याने रिक्त पदे भरण्यासाठी शिऊर येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंचायत
समिती, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला मात्र
आश्वासनाखेरीज काहीच पदरी पडले नाही , अखेर प्रशालेत
शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेला टाळे ठोऊन प्रशासकीय यंत्रणेचा निषेध केला होता दोन महिन्यानंतर २
शिक्षक देत प्रशासनाने बोळवण केली मात्र ठोस उपाययोजना न झाल्याने परीस्थिती जैसे थेच राहिली त्यातच
कार्यरत शिक्षकांच्या
प्रतिनियुत्यांनी या
समस्येत भरच घातली . खळेकर यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्यात आला मात्र
त्यांचा कार्यरत शिक्षकांवर नसलेला वचक व
त्यांच्या मनमानी कारभारामुळे शालेय व्यवस्थापन समितीसह शिऊर येथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ आक्रमक झाले व
खळेकर यांच्याकडून प्रभारी
मुख्याध्यापक पदाचा
कार्यभार काढून घेत बी के घुले यांच्याकडे सोपविला. रिक्त जागेबाबत प्रशासन काहीच ठोस कार्यवाही करत
नसल्याने जे के जाधव यांनी
पुढाकार घेत आपल्या
संस्थेतून २ विषय शिक्षकांची या प्रशालेवर नियुक्ती केली व शिक्षकांच्या अनियमितेला चाप बसावा यासाठी
बायोमेट्रिक मशीन दिले,.
वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील जिल्हा परिषद प्रशालेतील
भौतिक विकासासाठी शालेय
समितीसह ग्रामस्थ
प्रयत्नशील असताना इ लर्निंगसह गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे टिमकी वाजविणाऱ्या शिक्षण प्रशासनाच्या
पाठबळाअभावी इंग्रजी आणि विज्ञान या महत्वाच्या
विषयांच्या आणि दोन प्रतिनियुक्तीच्या समस्यासह शिक्षकांच्या एकूण सात जागा मागील सात वर्षांपासून रिक्त
असल्याने प्रशासनामुळे
शिक्षणाचा खेळखंडोबा
झाला आहे.. यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .४६४ विद्यार्थी पटसंख्या
असलेल्या शिऊर येथील जिल्हा परिषदेच्या शालेय आवारात
प्रशालेसह केंद्रीय प्राथमिक मुलींची शाळा आणि जि.प.मुलांची शाळा अशा एकूण तीन स्वतंत्र शाळा
आहेत. एकाच कॅम्पसमध्ये
पहिली पासून ते
दहावी पर्यंत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. शाळा विकासासाठी शालेय समितीच्या माध्यमातून
ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेतला असल्याने
मागील तीन वर्षात शाळेचे रूप पालटले आहे. एकीकडे ग्रामस्थ शाळा विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी
प्रयत्नशील असताना जि.प. प्रशासनाने मात्र, शाळेतील गुणवत्ता वाढीकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
सात वर्षांपासून
प्रशालेतील रिक्त
पदे भरण्यात यावी या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवलेली आहे.अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली, लोकप्रतिनिधींना
साकडे घातले, ग्रामसभेत देखील
ठराव घेण्यात आले. असे असताना ग्रामस्थांच्या मागणीला प्रशासनाने जुमानले नसल्याने रिक्त
जागांचा प्रश्न जैसे थे आहे. जिल्हा परिषदेचे
कारभारी बदलले असल्याने तात्काळ काम मार्गी लागेल या अपेक्षेने पालक, ग्रामस्थ व
माजी विद्यार्थी प्रशासकिय यंत्रणेकडे डोळे लाऊन आहेत.
या आहेत रिक्त
जागा
प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी
शिकवण्यासाठी दोन वर्षांपासून चक्क शिक्षकच नाही.
त्यामुळे विज्ञान विषयाच्या शिक्षिका श्रीमती महोरकर यांना दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय
शिकवावा लागत होता . मात्र,
जानेवारी २०१७
महिन्यात श्रीमती महोरकर यांची प्रतिनियुक्तीवर बदली झाल्याने आता इंग्रजी आणि विज्ञान विषयाच्या
शिक्षकांच्या कमतरतेमुळे नवीन दहावीच्या
विद्यार्थ्यांचे भवितव्य आता धोक्यात आले आहे. माध्यमिक व प्राथमिकच्या एकूण मंजूर १८ पदापैकी मुख्यध्यापक
-१, माध्यमिक शिक्षक -२, लिपिक-१, शिपाई-३ असे सात पदे
रिक्त असल्याने शाळेचा कारभार कसाबसा सुरू आहे.शिपायांच्या
तब्बल तीन जागा रिक्त असल्याने शिपयांचे काम विद्यार्थ्यांना तर कधी शिक्षकांना करावे लागत
आहेत. दुसरीकडे वारंवार
मागणी करून करू, पाहू या शब्दांच्या व्यतिरिक्त अधिकाऱ्याकडून
काहीच उपाययोजना होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या
आवारातच शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या बाबत निवेदन देण्यात आले आहे.
शिऊर प्रशालेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येणार असल्याचे आश्वासन अध्यक्षा
डोणगावकर यांनी शिष्ट मंडळाला दिले.
दोन शिक्षकांची नियुक्ती,
शिक्षकांचे मात्र घुमजाव
शिऊर प्रशालेत
शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी यासाठी सर्वच स्तरातून रेटा वाढल्याने
अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने दि २० जुलै रोजी विज्ञान विषयासाठी लासूर येथून
प्रशांत देसाई यांची तर तुर्काबाद येथून गणित विषयासाठी अतुल गर्गे या शिक्षकांची
नियुक्ती केली. मात्र महिना होत आला तरी हे दोन्ही शिक्षक महाशय अद्याप शिऊर येथील
प्रशालेत रुजू झालेले नसून त्यांनी आपल्या प्रशालेत रजा दाखल केली असल्याचे समजते.
तात्काळ पदे न भरल्यास सभेत रान पेटवणार :- प्रा. रमेश बोरनारे
शिऊर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या रिक्त
जागेसह असुविधांचे गाऱ्हाणे दि १० रोजी माजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सदस्य
प्रा. रमेश पा. बोरणारे यांच्याकडे मांडले. बोरनारे यांनी तत्काळ याकामी मी आपल्या
सोबत असल्याचे सुतोवाच करून दि ११ रोजी शिऊर येथील लोकप्रतिनिधी, माजी
विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषेदच्या अध्यक्षा डोणगावकर, विभागीय अप्पर आयुक्त
शिवानंद टाकसाळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सखोल चर्चा केली. मात्र शिऊर प्रशालेत
तात्काळ रिक्त पदे भरली न गेल्यास येणाऱ्या स्थायी समिती बैठकीत तसेच जि.प च्या
सर्वसाधारण सभेत रान पेटवणार असल्याचे प्रा. रमेश बोरणारे यांनी सांगितले.