मुदत वाढ मिळूनही अनेक शेतकरी पिक विमा पासुन वंचित
शिऊर -
राज्य
व केंद्र सरकारने पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्यास टोलवाटोलवी केली
आणि आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढ दिली
खरी माञ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाच याच लाभ घेता येणार आहे केवळ ऑनलाईन
पध्दतीने अर्ज करता येईल असा शासनातर्फे शासन निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे हजारो शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत. पिक विमा
भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती सुरूवातीला फकत ऑनलाईन पिक
विमा सेतु केंद्रावर भरता येईल असे सांगण्यात आले माञ ऑनलाईन वेबसाईट च्या
विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली शेतकरयातुन ओरड झाल्यावर शेवटचे
दोन दिवस ऑफलाईन पध्दतीने बँकेत देखील पिक विम्याची रक्कम स्विकारली गेली.
मात्र थोडा कालावधीत मोठी गर्दी झाल्याने अनेक शेतकरी वंचित राहीले यानंतर
मोठ्या प्रमाणात विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष यानी पिक विमा
भरण्यासाठी मुदत वाढ करण्याची मागणी केली. विधानसभेत देखील हा मुद्दा
गाजला. राज्यकर्त्यांनी शेवट मुदतवाढ देऊन मोठा गाजावाजा करून घेतला तसेच
विरोधकांना शांत केले पण या निर्णयाचा शासन निर्णय मध्ये फक्त बिगर कर्जदार
शेतकऱ्यांनाच मुदतवाढीत पिक विमा भरता येईल आणि फक्त ऑनलाईन पध्दतीनेच
अर्ज दाखल करता येईल असे निकष लावले गेले त्यामुळे हजारो कर्जदार शेतकरी
वंचित राहीले आहेत. तसेच पिक विमा मुदत वाढ मधील नवीन निकष शेतकऱ्यांना
माहीती नव्हते त्यामुळे शेतकर्यांना तलाठी कार्यालय, बँका, सेतु सुविधा
केंद्र अशी पायपीट करून वेल व पैसा वाया घालावा लागला. यामुळे शेतकऱ्यात
प्रचंड नाराजी पसरली आहे . शेतकरी कर्ज माफीचे निकष यामुळे मोठ्या प्रमाणात
शेतकरी कर्ज माफी पासुन वंचित राहाण्याची परीस्थिती असताना आता पिक
विमयातुन कर्जदार शेतकऱ्यांना मुदतवाढ काळात डावलण्यात आले आहे यामुळे
शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण नसल्याने निसर्गाच्या हातात शेतकऱ्यांचे
भविष्य आता अवलंबून असणार आहे .