शिऊर / प्रतिनिधी
उद्भवलेल्या
परीस्थितीतून मार्ग काढण्यासाठी समाजव्यापी विचार आणि प्रत्यक्ष कृतीशील
असणारी माणसच योग्य दिशेने वाटचाल करु शकतात . अशीच माणसं वारकरी म्हणुन
ओळखली जातात . अंतरंग व बाह्यरंग यात विसंगती नसलेले वारकरीच भागवत धर्माचे
आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन ह.भ.प सारंगधर महाराज भोपळे यांनी केले.
वैजापूर
ता
लुक्यातील लोणी खु येथे चालु असलेल्या संत शंकर स्वामी महाराज यांचा
फिरता नारळी सप्ताहात सहाव्या दिवशीचे प्रवचनरूपी पुष्प गुंफताना ह भ प
सारंगधर महाराज भोपळे बोलत होते. ते म्हणाले की , साधना आणि उपासना हा साधा
मार्ग नाही . " " अवघाची संसार सुखाचा करीन ! आनंदे भरीन तिन्ही लोकी ! ! "
" भाषा संतांच्याच तोंडी शोभुन दिसते . संतांच्या जीवनाचा आदर्श
डोळ्यासमोर ठेवून वारकरी खऱ्या अर्थाने आपले जीवन जगत असतात . वारकरी हाच
संतांचा उपासक असल्यामुळे संतांचा आदर्श आजही टिकून आहे . शंकर स्वामीच्या
या सप्ताहातुन अनेक साधु उदयाला आली आहे . योगिराज गंगागिरी महाराज हे
सुध्दा शंकर स्वामीच्या वारीला यायचे . लोणी बुद्रुक येथील मुस्लीम समाजाचा
नजिरभाई सारखा गायक त्या काळात सप्ताहात चाल म्हणायचा . सोमठाण्याची आई ,
निरक्षर बाई, समाजाची समाजव्यापी आई , स्वामीच्या सप्ताहातुन उदयाला आली .
अंचलगावातील किसनदेव सारखा वारकरी वारकऱ्याचा आदर्श ठेवुन गेला . संताच्या
विचाराचा वाद खऱ्या अर्थाने या वारकऱ्यांनी होऊ दिला नाही . आध्यात्मिकता
ही आधुनिक विचारापेक्षा कितीतरी नितळ असते याचा प्रत्यय या सप्ताहातुन
दिसतो आहे असे प्रतिपादन भोपळे महाराज यांनी केले . सर्व जातीची माणसं जात
विसरून वागली , वागताना दिसताहेत . कारण संतानीच खऱ्या अर्थाने जातीय
वाद नष्ट करून एक आदर्श आपल्या आचरणातून निर्माण केला . हा आचारयुक्त
विचाराचा ठेवा जतन करण्याचे कार्य लोणी खुर्द गावामध्ये होणाऱ्या अखंड
हरीनाम सप्ताहाच्या माध्यमाने चालु आहे असल्याचे भोपळे महाराज प्रवचनात
म्हणाले. या प्रसंगी परिसरातील हजारो भाविक भक्त , ग्रामस्थ उपस्थित होते .