सार्वजनिक उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा : सुनील लांजेवार
शिऊर / प्रतिनिधी
येणाऱ्या पोळा, बकरी ईद, व गणेशोत्सव काळात सामाजिक बंधुभाव व सलोखा कायम ठेवून सार्वजनिक उत्सव शांततेत संपन्न करून उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन वैजापूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांनी केले.
शिऊर पोलीस ठाण्यात दि १९ रोजी आयोजित शांतता समिती व गणेश मंडळ सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
गणेश मंडळांनी समाजात नवविचार रुजविण्याचे काम केले पाहिजे त्यासाठी त्यांना कार्यप्रवृत्त करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यासाठी पूरक असलेला गणेशोत्सवाचा उद्देश बाजूला ठेऊन काही अवैद्य कार्यामुळे मारक न ठरता सामाजिक उपक्रम राबवावे, ऐतिहासिक असलेले शिऊर गाव संत परंपरेचे पाईक असून धार्मिक व जातीय संघर्ष उपयोगाचा नसल्याचे लांजेवार म्हणाले. राजकारण विरहित सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन देखील सुनील लांजेवार यांनी यावेळी केले.
शिऊर गावाला आध्यात्मिकतेचा पगडा असून सर्व सण उत्सव एकोप्याने साजरे होत असून याकामी पोलिसांचे सहकार्य मिळत असल्याचे पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाषचंद्र जाधव म्हणाले.
या बैठकीस सरपंच नितीन चुडीवाल, माजी सरपंच तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बबनराव जाधव, माजी उपसभापती सुभाषचंद्र जाधव , माजी सरपंच निलेश देशमुख, माजी उपसरपंच गिरीश भावसार, भास्कर जाधव, शिवाजी आढाव, अशोक चव्हाण,अमीरअली सैययद्, वसंत पवार, लक्ष्मण धनेश्वर, अशोक पगारे, प्रकाश सोनवणे, अनिल भोसले, अकबरभाई, पोलीस पाटील सुनील देशमुख, अशोक जाधव, चांगदेव जाधव, संकेत चुडीवाल यांच्यासह शिऊर पोलीस ठाण्याचे गणेश जामदार, पाटोळे, रोहिदास तांदळे, रज्जाक शेख यांच्यासह शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सोबत फोटो:- (छाया:- सौरभ लाखे)