भावनिष्ठ पूजा भगवंताला आवडते: संदिपान महाराज
प्रतिनिधी.......
भक्तीचे खरे स्वरूप चरणपूजन असून भावनिष्ठ पूजा भगवंताला आवडते, संतांच्या चरण स्पर्शाने मानवातील अभिमान नाहीसा होत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प संदिपान महाराज शिंदे यांनी केले.
वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे चालू असलेला श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या २७२ व्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दि २८ रोजी त्यांचे कीर्तन झाले यावेळी ते बोलत होते.
'घालीन लोटांगण, वंदीन चरण' या अभंगावर विवेचन करतांना शिंदे महाराज म्हणाले की, निष्काम पणा हे भक्तीचे केंद्र असून निष्कामपणे केलेली भक्ती फलद्रूप होते, भगवंत भक्त संस्कारी असायला पाहिजे, संस्काराने बुद्धी पवित्र होते महापुरुषावर चांगले संस्कार करण्यात आल्याने त्यांचे गुणगान गायले जाते चांगले संकल्प ठेवल्याने जीवन प्रगल्भ होत असल्याचेही संदिपान महाराज म्हणाले.
समाज प्रबोधनासाठी हरिनाम सप्ताह गरजेचा : हरिभाऊ बागडे
हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपली पौराणिक, सांस्कृतिक माहिती मिळत असल्याने समाजप्रबोधनासाठी हरिनाम सप्ताह गरजेचा असल्याचे विधानसभाअध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, या अखंड हरिनाम सप्ताहास त्यांनी दि २९ रोजी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
जीवनाची वागणूक व सहकार्यवृत्ती कशी असावी याची शिकवण सप्ताहाच्या माध्यमातून मिळत असल्याचे सांगत कोणाचे चांगले करता येत नसेल तर करू नका मात्र वाईट कोणाचेही चिंतन करू नका हीच शिकवण संतांनी दिल्याचे हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, नगरसेवक राजू शिंदे, ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह भाविक ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.