" ते " अलगद उचलतात १०८ किलोवजनाची दगडगोटी
शिऊर / सौरभ लाखे
१०८ किलो वजन असलेली दगडगोटी………. . उचलण्यासाठी अत्यंत अवघड………. तरीही "ते" अलगद उचलतात……… केवळ उचलतच नाही तर उचलून डोक्यावर घेऊन मारोती व शनिमंदिराला प्रदक्षिनाही घालतात.…. बावन्न वर्ष वय असलेला बबनराव गजानन जाधव असे या अवलियाचे नाव.
अलापूरवाडी [ ता. वैजापूर] येथील उपसरपंच असलेले बबनराव गजानन जाधव [ तात्या ] सध्या शिऊरसह तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे . शिऊर येथील वरचा पाडा भागातील मारोती मंदिर जवळ एक पुरातन १०८ किलो वजन असलेली दगडगोटी असून पूर्वीच्या लोकांच्या शक्तीप्रदर्शनाचे प्रतिक मानले जाते . पूर्वीच्या काळी शरीरसौष्टवाला व विविध व्यायाम प्रकाराला महत्व दिले जात असे मात्र काळाच्या ओघात व्यायामप्रकार मागे पडत आहेत . त्या व्यायामाचे महत्व आळशी बनू पाहणाऱ्या आजच्या युवापिढीला कळावे यासाठी बबन जाधव प्रयत्नशिल आहे त्यांना कुठलेही व्यसन नसून तरुण पिढीला व्यसनमुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे तसेच तरुण वर्गाचा ते आदर्श आहेत त्यांना कुस्तीचीही आवड असून त्यांनी अनेक कुस्तीपटू ही तयार केले आहे