सामाजिक दातृत्वाचा रथ पुढे नेणार : जे.के. जाधव शिऊर : समाजाने आम्हाला भक्कम पाठबळ दिल्याने सर्व क्षेत्रांत यश लाभत आहे, आमच्यावर असलेले सामाजिक ऋण सहज फेडणे अशक्य आहे या सामाजिक दातृत्वाचा रथ आपण सातत्याने पुढे नेणार असल्याचे प्रतिपादन जे.के.जाधव यांनी केले. राज्याचे माजी उद्योग संचालक, भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे अध्यक्ष जे .के.जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव व भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सहसचिव विक्रांत जाधव यांच्या वाढदिवस निमित्ताने जिल्हयात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तर शिऊर येथे जाधव बंधूंचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. वाढदिवस निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जे.के जाधव यांनी आपला जीवनपट कथन करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपले ध्येय निश्चित करून ध्येयप्राप्ती करा , आदर्श व्यक्ती म्हणून समाजासमोर या सर्वांगीण विकास हेच खरे जीवन असून सात्विक आहार सेवन करा, खेळ व व्यायाम महत्वाचा असून व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन या वेळी जे.के जाधव यांनी केले. दरम्यान ग्रामस्थांनी जाधव बंधूंच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय योगदानाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. लायन्स क्लब चिकलठाणा च्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व विशद करण्यात आले. दि ७ रोजी जिल्हयात विविध ठिकाणी वृक्षारोपण, गरजुंना कपडे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गणवेश वाटप शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी माजी जि प सदस्य सुनील पैठणपगारे, माजी सरपंच अशोकराव जाधव, निलेश देशमुख, उपसरपंच जाकिर सय्यद, नंदू जाधव, लक्ष्मण जाधव, धन्नालाल चुडीवाल, काशिनाथ जाधव, भास्कर जाधव, शिवाजी आढाव, ज्ञानेश्वर महाराज मधाने, भगवान महाराज ठुबे, नवनाथ आढाव, अशोक चव्हाण, प्रा.विश्वनाथ बोडखे, प्रकाश लाखे, संजय जाधव, लक्ष्मण धनेश्वर, कैलास जाधव, शिरीष चव्हाण, नितीन भावसार, सुशील देशमुख, अरुण गोरे, रामेश्वर साळुंके, संदीप जाधव, मंगेश जाधव, राजेंद्र सदावर्ते, प्रशांत झाल्ट, संदेश जाधव यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. चंद्रशेखर देशमुख यांनी केले.
 
Top