शिऊर ग्रामपंचायतीच्या  १२ सदस्यांचे राजीनामे
शिऊर : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शिऊर येथील १२ ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या सद्सत्वाचे राजीनामे सरपंच नितीन चुडीवाल यांच्याकडे गुरुवार दि २६ रोजी सुपूर्द केले.
वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या शिऊर मध्ये १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे या पैकी १२ सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे.
उपसरपंच जाकिर सैययद, माजी सरपंच अशोकराव जाधव, सुलोचनाबाई पैठणपगारे, माजी उपसरपंच गिरीश भावसार, नंदू जाधव, नवनाथ आढाव, चेतन दिवेकर, वैशाली देशमुख, राजश्री जाधव, ज्योती जाधव, मंगल पवार, सुनीता चव्हाण यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा सरपंच नितीन चुडीवाल यांच्याकडे सोपविला आहे.
मराठा आरक्षणासाठी सरपंच या नात्याने माझा देखील पाठिंबा आहे. शिऊर ग्रामपंचायतचे बारा सदस्यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. सदर राजीनाम्या करिता विशेष बैठक बोलावुन पडताळणी करण्यात येईल आणि नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे सरपंच नितीन चुडीवाल यांनी सांगितले.

 
Top