शिऊर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शिऊर : प्रतिनिधी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शिऊर येथे  जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. दि १ ऑगस्ट रोजी शिऊर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर झालेल्या अभिवादन कार्यक्रमात आजी माजी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला , उपस्थिती मान्यवरांनी अभिवादन केले. सरपंच नितीन चुडीवाल, अशोक पगारे यांनी मनोगत व्यक्त केले , प्रास्ताविक विलास पगारे, सूत्रसंचालन बाबासाहेब  पगारे यांनी तर आभार गिरीश सोळसे यांनी मानले. कीर्ती सोळसे, दीपाली धनेश्वर या विद्यार्थीनीनी भाषणे केली. उपस्थित मान्यवरांनी साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी सरपंच नितीन चुडीवाल, उपसरपंच जाकिर सैययद्, माजी जि. प सदस्य सुनील पैठणपगारे, माजी सरपंच बबनराव जाधव, चंद्रशेखर खांडगौरे, निलेश देशमुख, शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे, माजी उपसरपंच नंदू जाधव,  तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष भास्कर जाधव,नवनाथ आढाव, चेतन दिवेकर, अय्युब सैययद्, राजेंद्र जाधव, प्रा.चंद्रशेखर देशमुख, प्रा.कैलास जाधव, शिरीष चव्हाण,  बाळू पवार, लक्ष्मण धनेश्वर, अशोक पगारे, सुनील देशमुख, सुनील सुरासे, अनिल भोसले, नितीन भावसार,  यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गिरीश सोळसे, सतीश जोगदंड, गोरख सोळसे, सुधाकर सोळसे, सतीश सोळसे, उत्तम लोंढे, सुरज सोळसे, अमोल कांबळे, नंदू त्रिभुवन, शुभम पानपाटील, विशाल गायकवाड, साईनाथ सोळसे, रोहित सोळसे आदींनी परिश्रम घेतले. 
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top