पराक्रम, परोपकार व त्यागामुळेच श्री कृष्ण चरित्रनायक : भागवताचार्य पंढरीनाथ महाराज पगार
शिऊर / प्रतिनिधी
कर्म सर्वच करत असतात चरित्र मात्र भगवंतच करतात ज्या क्रियेत पाप पुण्याची निर्मिती नाही त्याला चरित्र म्हणतात. पराक्रम, परोपकार व त्यागामुळेच श्री कृष्ण चरित्रनायक असल्याचे प्रतिपादन शिऊर येथील श्री संत शिवाई संस्थानचे अध्यक्ष भागवताचार्य ह भ प पंढरीनाथ महाराज पगार यांनी केले.
 शिऊर येथील श्री संत शिवाई माता यांच्या पुण्यतिथी ( रथसप्तमी) निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दि 25 रोजी पंढरीनाथ महाराज पगार यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
"येदसे चरित्र केले नारायणे " या संत तुकाराम महाराजांच्या गौळणीवर विवेचन करतांना पगार महाराजांनी भगवान श्री कृष्णाच्या बाललीला विशद केल्या.
विचारांची प्रगल्भता मानवातील सर्वात  मोठा गुण असून वयाने मोठे होण्यापेक्षा विचाराने मोठे होणे महत्त्वाचे आहे,
श्री राम कृष्णात आचार विचाराची संपन्नता होती ईश्वराशी एकनिष्ठ होणे हाच काला असल्याचे पंढरीनाथ महाराज यावेळी म्हणाले.
दि 18 जानेवारी पासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये संगीतमय श्रीमदभागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळा संपन्न झाला.
प्रेमानंद देशमुख, ज्ञानेश्वर बोगीर, मच्छिन्द्रनाथ महाराज, भरतगिरीजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, उल्हास सूर्यवंशी, नित्यानंदगिरी महाराज यांची कीर्तने झाली. दि 24 रोजी संत शिवाई माता यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिऊर गावातून टाळ मृदृगाचा गजरात पालखी मिरवणुक काढण्यात आली.
काल्याच्या कीर्तनप्रसंगी माजी आमदार आर एम वाणी, सरपंच नितीन चुडीवाल, माजी जि.प सदस्य सुनील पैठणपगारे, माजी उपसभापती सुभाषचंद्र जाधव, माजी सरपंच अशोकराव जाधव , उपसरपंच जकिर सैययद्, माजी उपसरपंच गिरीष भावसार, नंदू जाधव, नवनाथ आढाव
 प्रकाश लाखेस्वामी, शिरीष चव्हाण,गंगाधर दांडगे, उमाकांत एकबोटे,  यांच्यासह ढेकू आश्रमाचे रामनाथ देव बाबा, चंद्रभान दादा चिकटगावकर, प्रभाकर महाराज चन्ने, कृष्णा महाराज, ज्ञानेश्वर महाराज मधाने, सारंगधर महाराज भोपळे, भगवान महाराज ठुबे पुरुषोत्तम महाराज यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.
यशस्वीतेसाठी दत्तात्रय वरपे, भारत दांडगे, नंदू वरपे, धनवट गुरुजी आदींनी परिश्रम घेतले.
सोबत फोटो -कॅप्शन
शिऊर येथील श्री संत शिवाई माता यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता संस्थांनचे अध्यक्ष पंढरीनाथ महाराज पगार यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली .
 
Top