शिऊर / सौरभ लाखे
शिऊर गावातील परवानाधारक दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रस्तावावर स्वाक्षरी केलेल्या गावतील स्त्री पुरुषमतदारांच्या स्वाक्षरी पडताळणी प्रक्रिया  दि २४ रविवार रोजी संपन्नझालीयात केवळ ६५१ मतदारांनी सहभाग नोंदविल्याने या दारूमुक्तशिऊर गावाचा फियास्को झाला आहे.
      तीर्थक्षेत्र असलेल्या शिऊर गावातील परवानाधारक दारू दुकानकायमस्वरूपी बंद करण्यात यावी हि मागणी गेल्या चार वर्षापासून आहे तत्कालीन सरपंच सुलोचनाबाई पैठणपगारे यांच्या कार्यकाळात देखीलदारू दुकान बंद करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता त्यावेळीआडव्या बाटलीच्या आधी देण्यात येणाऱ्या निवेदनावर महिलांच्यापुरेश्या स्वाक्षऱ्या  झाल्याने पुढील कार्यवाही झालीच नाहीशिऊरयेथील देशी दारू विक्री दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशीमागणी करत महिलांनी शिऊर येथील दारू दुकानावर हल्लाबोल केलाहोता  संतप्त झालेल्या महिलांनी दि  मे २०१७ रोजी दारू विक्रीकरणाऱ्या दुकानावर मोर्चा काढून दुकानाची तोडफोड करून दुकानालाटाळे ठोकले तर दारू दुकान परिसरात जाळपोळ करून दुकानपेटविण्याचा प्रयत्न महिलांनी केला होताशिऊर येथील उपबाजारपेठशेजारी परवानाधारक देशी दारू विक्री दुकान आहे,हे दुकानकायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी रणरागिनीनीदुकानातील दारूच्या बॉक्स मधील बाटल्या फोडून तीव्र संताप व्यक्तकेलाया दुकानाला टाळे ठोकून फोडलेल्या बाटल्याना पेटवून देतदुकान परिसरात जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला होतानंतर पुन्हाशिऊरच्या ग्रामसभेत परवानाधारक दारू दुकान कायमस्वरूपी बंदकरावे या बाबत ग्रामसभेत ठराव संमत करण्यात आला होतातरशिऊर पोलिसांनी दारूबंदी अधिनियम १४८ अन्वये दारू दुकान २८दिवसांसाठी बंद ठेवले होतेशिऊर येथील परवानाधारक दारू दुकानकायमस्वरूपी बंद करण्यात यावी या मागणीचे निवेदन शिऊरग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते.
महिलासह लोकप्रतिनिधींनी  शिऊर गावात डोअर टू डोअर फिरूनगावातील मतसंख्येच्या पंचवीस टक्के हुन अधिक महिला  ग्रामस्थांच्यास्वाक्षऱ्या घेतल्या होत्या त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे  प्रभारीनिरीक्षक कोरे यांनी एका विशेष बैठकीत मार्गदर्शन करून नागरिकांच्याशंकाचे समाधान केले होते.


या नंतर  परवानाधारक दारू दुकान बंद करण्याच्या प्रस्तावासाठी ज्यामहिलांनी  ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत त्या शिऊर गावातीलरहिवासी आहेत का तसेच त्यांचे मतदान शिऊरमध्ये आहे का याचीपडताळणी करण्यात येणार आली  दि २४ डिसेंबर रोजी खोटीस्वाक्षरीदुबार स्वाक्षरीचीही तपासणी करण्यासाठी प्रस्तावावर सह्याकेलेल्या महिलांना आधिकारी वर्गासमोर पुन्हा स्वाक्षरी करावी लागलीयात २७०० मतदारांपैकी २०५३ मतदारांनी सहभाग नोंदविणे आवश्यकहोते मात्र केवळ ६५१ मतदारांनी सहभाग नोंदविल्याने दारूमुक्तीचाफज्जा उडाला दरम्यान स्गिऊर गावातील दारू दुकान बंदकरण्यासाठी स्वाक्षरी पडताळणी प्रकियेला स्वाक्षरी केलेल्या मतदारांनीउपस्थित राहावे असे शिऊर ग्रामपंचायत प्रशासनाने करत सलग दोनदिवस ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन करून  रविवारी सकाळीलोकप्रतिनिधींनीहि गावातून रली काढत या प्रकियेत सहभागी  होण्याचेआवाहन केले तसेच सरपंचउपसरपंचआजी माजी ग्रामपंचायतसदस्यतंटामुक्त समितीचे पदाधिकारी  सामजिक कार्यकर्ते महिलांनी स्वाक्षरी पडताळणी झालेल्या शिऊर येथील जिल्हा परिषदप्रशालेच्या आवारात ठाण मांडून होतेपडताळणी साठी आलेल्यामतदारांना पोलचिट वाटप करून पडताळणी कक्षाकडे घेऊनजाण्यासाठी ते सहकार्य करत होते तर तगड्या पोलीस बंदोबस्तामुळेप्रशालेच्या आवाराला छावणी चे स्वरूप प्राप्त झाले होते.
 
Top