जे.के जाधव साहित्य पुरस्काराचे शुक्रवारी वितरण
औरंगाबाद जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
शिऊर / प्रतिनिधी
शिऊर येथे जे.के जाधव साहित्य पुरस्कार वितरण सोहळा तसेच औरंगाबाद जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन व पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून दि 22 रोजी सकाळी 10 वाजता शिऊर येथील  संत बहिणाबाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात हे कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दि . 22 शुक्रवार रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत ग्रंथ दिंडी काढण्यात येईल त्यानंतर सकाळी १० वाजता जेष्ठ साहित्यिक रा.रं बोराडे यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन होईल. सकाळी १०:३० वाजता औरंगाबाद  जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनास प्रारंभ होईल माजी कुलगुरू डॉ नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उदघाटन होईल.
सकाळी ११ ते १ दरम्यान जे .के. जाधव साहित्य पुरस्काराचे वितरण समारंभ होईल डॉ. शारदा देशमुख यांच्या चिरेबंदी कळा या कथा संग्रहास व गणेश मरकड यांच्या काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान या काव्य संग्रहाला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे.के जाधव असतील तर डॉ.भीमराव वाघचौरे  परिक्षकीय भाष्य करतील.
दुपारी 2 वाजता ग्रंथालय विषयक मार्गदर्शन व चर्चासत्र होईल यात राहुल शिंदे मुंबई सार्व विश्वस्त कायदा १९५० या वर मार्गदर्शन करतील तर बद्रीनाथ खरात हे सार्व विश्वस्त संस्थेचे हिशेब लेखन यावर मार्गदर्शन करतील.
दुपारी तीन वाजता सहविचार सभा होईल यात शासकीय ग्रंथालय विभाग आधिकारी, ग्रंथालयसेवक सहभागी होतील.
सायंकाळी चार ते पाच दरम्यान खुले अधिवेशन व ठराव होतील व समारोप होईल. या अधिवेशन व पुरस्कार वितरण समारंभाला एकनाथराव जाधव ,अ. मा. गाडेकर, शीतल मेहता, ल.दि.कुमठेकर, गुलाबराव मगर, कैलासचंद्र गायकवाड, सरपंच नितीन चुडीवाल, दत्ता पगार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दरम्यान अजब प्रकाशन कोल्हापूर तर्फे विविध पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असणार असून १०० ते ७०० रुपयांची पुस्तके केवळ ६० रुपयांत विक्री करण्यात येणार आहे . उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
Top