शिऊर येथे भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

शिऊर । ६८ व्या भारतीय संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने शिऊर येथील भदंत आनंद कौसल्यायन बुद्ध विहारात रविवारी व्याख्यानासह संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले असून २६/११तील शाहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना अर्थात संविधान हे दि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत सादर करून राष्ट्राला अर्पण केले होते.या ऐतिहासिक घटनेला ६८ वर्षे पूर्ण होत आहे. शासन निर्णयानुसार हा २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. शिऊर येथील भदंत आनंद कौसल्यायन बुद्ध विहार मंडळाच्या वतीने रविवार दि २६ रोजी संविधान गौरव दीना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.सकाळी ९ वाजता संविधान गौरव रॅलीचे काढण्यात येणार आहे.सकाळी १० वाजता सामूहिक बुद्ध वंदना झाल्या नंतर २६/११ तिल शाहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन होऊन प्रमुख व्याख्याते मार्गदर्शन करतील. यात औरंगाबाद खंडपीठाचे ऍड सुभाष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवंसरा आणि बार्टी संस्थेतील रवी कळसकर यांचे व्याख्यान होणार आहे.या कार्यक्रमाला सर्व पक्षीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांच्यासह ग्रामस्थानी उपस्थित राहण्याचे आवाहन भदंत आनंद कौसल्यायन बुद्ध विहार मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top