शिऊर येथे विकास कामांचा धडाका
व्यापारी संकुल, अंगणवाडी इमारतींचे   उदघाटन
बाजारओटा, पेव्हरब्लॉक चे लोकार्पण
स्मशानभूमी व सिमेंट रस्त्याचे भूमीपूजन
शिऊर / सौरभ लाखे
शिऊर ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमीपूजन, व उदघाटन दि 11 रोजी सरपंच नितीन चुडीवाल यांच्या हस्ते संपन्न झाले.
शिऊर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात ग्रामनिधीतुन बांधण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व्यापारी संकुल व पोलीस ठाणे कॉलनी येथील तसेच व्यवहारे वस्ती येथील अंगणवाडी इमारतीचे उदघाटन  तसेच शिऊर येथील आठवडी बाजारतळात बांधण्यात आलेल्या बाजारओटे, नाली बांधकाम, व पेव्हरब्लॉकचे लोकार्पण व जिल्हा वार्षिक योजनेतून स्मशानभूमी बांधकाम  आणि वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या संत शिवाई मंदिर परिसरातील सिमेंट रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच नितीन चुडीवाल, उपसरपंच जाकीर सैययद्, माजी जि प सदस्य सुनील पैठणपगारे, माजी सरपंच चंद्रशेखर खांडगौरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बबनराव जाधव , अशोकराव जाधव, निलेश देशमुख, माजी उपसरपंच गिरीश भावसार, नंदू जाधव, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आढाव, भाऊसाहेब काळे, वैशाली देशमुख, त्रिशला खांडगौरे, ज्योती जाधव, निलकमल चुडीवाल, राजश्री जाधव, मंगल पवार, चेतन दिवेकर, सुनीता चव्हाण, पारस बागुल, पवन चुडीवाल,बाळासाहेब जाधव, कृष्णा जाधव,  अशोक चव्हाण, बाळू पवार, प्रा.चंद्रशेखर देशमुख, मंगेश जाधव,  शिरीष चव्हाण, राजू वरपे, यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

 
Top