आयटकच्या वतीने विजयी मेळावा आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन

शिऊर । अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी ११ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान मानधनवाढ तसेच विविध मागण्यासंदर्भात राज्यभर करण्यात आलेला संप आणि त्याला मिळालेल्या यशाबद्दल वैजापूर आयटकच्या वतीने 
(गुरुवार १२ ऑक्टोबर) रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विजयी मेळावा तसेच अनेकांनी संपाला दिलेला पाठिंबा आणि सहकार्या बद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

वैजापूर पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी दीड वाजता होणाऱ्या या सत्कार सोहळ्याला मार्गदर्शन आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य उपाध्यक्ष प्रा.राम बाहेती राहणार असून संपाला पाठिंबा देणारे आमदार भाऊसाहेब चिकटगावकार, वैजापूरच्या काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा शिल्पताई परदेशी, शिवसेनेच्या संगीताताई रमेश बोरणारे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.तसेच कार्यक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी कवडदेवी, माजी जि प सदस्य सुनील पैठणपगारे यांची देखील उपस्थिती राहणार आहे. यासह वैजापूरसह तालुक्यात संपा बाबत व्यापक प्रसिद्धी देऊन सहकार्य करणाऱ्या सर्वच दैनिकाच्या पत्रकारांची प्रमुख उपस्थिती राहणार असून सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असल्याने संपाला या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी लेखी पाठिंबा दिला होता त्या सर्व सरपंचांना देखील या मेळाव्यात सन्मानित केले जाणार आहे. या मेळाव्यातील सत्कार सोहळा नंतर शासनाने अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीस यांना सेवा जेष्ठतेनुसार काशी मानधनवाढ व त्यावर दरवर्षी मिळणारी पाच टक्के मानधनवाढ यासह संपामुळे मिळलेल्या यशाबद्दल सविस्तर माहिती तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष तथा राज्य कौन्सिल सदस्या कॉ. शालिनी पगारे, कार्याध्यक्ष रंजना माळी, उपाध्यक्ष शबाना शेख, पंचशीला धनेश्वर, मीना पवार, सोनी चव्हाण, सुशीला लाखे, निर्मला बोरगे, लीला बागुल, कल्पना माळी, रेणुका ढेरंगे, मनीषा बागुल, वंदना म्हस्के, संजीवनी पंडागळे, गीतांजली पहाडे, शीतल राजपूत, सुनीता भागवत आदींनी केले आहे.
 
Top