"त्या" अपघातातील एकाचा मृत्यू
शिऊर / प्रतिनिधी
दि.२९ सप्टेंबर रोजी वैजापूर - शिऊर रस्त्यावर खंडाळा येथील पेट्रोलपंपा समोर पीकअप या वाहनाने हुल दिल्याने दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीवर असलेल्या तिघांपैकी एक जण गंभीर तर दोघे जण जखमी झाले होते या अपघातात मेंदूला मार लागून गंभीर जखमी झालेल्या शिऊर येथील गणेश लोखंडे ( २९) या युवकाचा दि ५ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला .
नवरात्र उत्सव निमित्ताने शिऊर येथील तिघे युवक दुचाकीवर उक्कडगाव येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते, दर्शनहुन परतत असताना खंडाळा येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता , दुचाकीवर असलेले गणेश लोखंडे यांच्या मेंदूला व पायाला मार लागला होता तर याच दुचाकीवर असलेले प्रकाश कायस्थ व गणेश म्हस्के यांच्या पायाला व हाताला मार लागला होता. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते गणेशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे रवाना करण्यात आले तर प्रकाश कायस्थ यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांनाही औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच गणेश याच्यावर वैजापूर येथे उपचार सुरू आहेत.  गणेश लोखंडे याच्यावर उपचार सुरू असताना दि ५ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली.
*कुशल कारागीर होता गणेश*
या अपघातात मृत झालेला गणेश हा कुशल कारागीर होता, शिऊर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात साई इलेट्रॉनिक्स या नावाने दुकान असून सर्व इलेट्रॉनिक्स साहित्य रिपेअर करून देण्यात त्याचा विशेष हातखंडा होता, सर्वच ग्राहकांसोबत आपुलकीने वार्तालाप करून तात्काळ सुविधा तो देत असे, त्याच्या निधनाने शिऊर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 
Top