रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे  गारज येथे भव्य रास्ता रोको आंदोलन

रस्त्याची तत्काळ दुरुस्त न केल्यास गाठ माझ्याशी :- अभय पाटील चिकटगावकर
शिऊर / सौरभ लाखे
मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेले वैजापूर ते मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद या ९० किमी मार्गाची दयनीय अवस्था झाली असून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताची जणू मालिकाच सुरू झाली आहे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी दि १६ रोजी  राष्ट्रवादी च्या वतीने वैजापूर तालुक्यातील गारज येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व माजी जि.प सदस्य अभय पा. चिकटगावकर यांनी केले. या आंदोलनामुळे वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या, शिऊर पोलिसांनी अभय पा. चिकटगावकर यांच्यासह पदाधिकार्यांना स्थानबद्ध केले.
औरंगाबाद ते शिऊर बंगला या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून बंगला कडून वैजापूर तसेच मालेगाव रस्त्याची देखील दुरावस्था झालेली आहे. त्यातच कन्नड येथील घाटातील रस्ता खचल्याने धुळे, सुरत कडे जाणारी वाहतूक याच मार्गावरून वळविण्यात आली आहे. विशेषतः शिऊर बंगला ते औरंगाबाद रस्त्याची स्थिती खड्डा वाचवा अन जीव वाचवा अशीच झाली असून रोज किरकोळ व गंभीर अपघात होत आहे, या जीवघेण्या रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून वाहनधारकांनाही पाठीचे आजार जडले आहे . एकीकडे समृद्धी महामार्गसाठी करोडोरुपयांची खिरापत वाटत असताना मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.

धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याने औरंगाबाद मालेगाव रस्त्यावर अवजड वाहनांची संख्या वाढली असुन हा रस्ता पुर्ण पणे असुरक्षित झाला आहे लहान मोठ्या वाहनांचीसंख्या हि पाचपट वाढली आहे यामुळे  वाहतुकीच्या कोंडी  सोबत रोडची अत्यंत  दयनीय अवस्था  झाली आहे  . धुळे सोलापूर या राष्ट्रीय  महामार्गावरील चाळीसगाव घाटातील रस्ता खचल्याने या मार्गाने जाणारी जड वाहतूक देवगाव रंगारी,  गारज , शिऊर बंगला- नांदगाव मार्गाने होत आहे. पाच पट वाहतूक वाढल्याने झाल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे तसेच खाजगी व  एस. टी. महामंडळाच्या बसेसच्या  रोज  शेकडो फेर्या होत आहे दरम्यान पावसामुळे या रोडवर  हजारो ठिकाणी मोठमोठी खड्डे पडल्याने या रोडवर छोटे मोठे  अपघात होतांना दिसत आहे.
रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत  करावी लागत आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने अनेकदा याठिकाणी महाविद्यालयीन युवती,प्रवाशी आपल्या दुचाकी गाडीवरून चिखलात पडून गंभीर जखमी झाल्या आहेत.
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गेल्या पंधरा दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे.प्रतिवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरवस्था होत असते. त्यामुळे अपोआपच मोठी वाहतूक कोंडी होवून अपघाताला निमंत्रण मिळते. या रस्त्याशी नागरिकांना रोजच सामना करावा लागत असतानाही संबधित विभाग केवळ या रस्त्याची नावाला मलमपट्टी करून रस्ता दुरुस्त करतात. मात्र, अल्पावधीतच हा रस्ता उखडत असल्याने नागरिकांसह वाहनचालकही वैतागले आहेत.
 धुळे सोलापूर मार्गाने जाणार्या खाजगी व एस.टी. महामंडळाच्या चाळीसगाव साक्री येरंडोल दोंडाईचा  नंदूरबार सूरत गुजरात  होत असलेली सर्व वाहतूक देवगाव गारज मार्गाने होत असून दररोज सुमारे साडेतीशे फेर्या या मार्गाने होत आहे  औरंगाबाद नाशिक मार्ग हा अत्यंत  वर्दळीचा  असतांना  धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गच्या वाहतूकीची भर पडली आहे  आणि सर्वांत महत्त्वाचा  महामार्गावरील या या अवजड वाहतुकीने या मार्गावर मोठ मोठी खड्डे पडली आहेत  महामार्ग चौपदरीकरणाचा विषयही गेली दहा वर्षापासुन चर्चेत आहे. आजही तो प्रश्न मिटलेला नाही. त्यातच गेल्या काही वर्षात महामार्गावर अवजड वाहतुकीचा ताण अधिक वाढला आहे. लहान वाहनांची संख्याही वाढल्याने महामार्ग कायम 'बिझी' असतो  लोकप्रतीनिने व बांधकाम विभागाने लवकरात लवकर यावर तोडगा  न  काढल्यास या मार्गावर मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
 ५५ किमी अंतर पार करायला लागतात तब्बल अडीच तास
शिऊर बंगला ते औरंगाबाद हे केवळ ५५ किलोमीटरचे अंतर पार करतांना मोठ्या दिव्यातून जावे लागत असताना अरुंद रस्ता, वाहतुकीची वर्दळ व खड्डेमय मार्गामुळे औरंगाबाद गाठायला तब्बल अडीच तासाचा अवधी लागत आहे. उपचारासाठी औरंगाबाद येथे रुग्ण नेतांना रस्त्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. नोकरी व व्यवसायनिमित्त अप डाऊन करणाऱ्याचे मात्र या दुरवस्थेमुळे हाल होत आहे.
 देवगाव रंगारी येथील खडकी  व येळगंगा नदीवर असलेल्या  ब्रिटीशकालीन पुलांचा धोका वाढला 
धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने अवजड वाहतूक  देवगाव रंगारी जवळील खडकी व येळगंगा या ब्रिटिशकालीन पुल हे त्यावेळच्या वाहतुकीचा अंदाज घेऊन बनवण्यात आले होते परंतु आज पंचविस ते पंन्नास टनांपर्यंतचे अवजड वाहणे या अरूंद व कमकुवत पुलावरून जात आहे नदीवरील दोन्ही पुलाचे कठाडे हे कमजोर आहे व हे पुल हे अवजड  वाहतुकीच्या द्रुष्टिणे घातक आहे खाजगी तसेच  एस. टी. महामंडळाच्या मुंबई नाशिक धुळे मालेगाव शिर्डी  व  सोलापूर धुळे गुजरात होणारी वाहतुकही याच मार्गाने होत आहे  त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही .
अन्यथा गाठ माझ्याशी : अभय पाटील चिकटगावकर


या रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच या समस्येकडे लक्ष देऊन लोकांना खड्डेमुक्त रस्ता करून द्यावा , खड्डे बुजवताना खडी व मुरूम यांचा वापर करूनच बुजवावे त्यामध्ये माती असता कामा नये अधिकारी वर्गाने समाधानकारक सहकार्य करावे अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशारा अभय पाटील चिकटगावकर यांनी यावेळी दिला.
हा  रस्ता  म्हणजे मृत्यूचा सापळा झालेला आहे. अगोदरच रोडवर खड्डेच खड्डे झालेले असताना चाळीसगाव कडील ट्रॅफिक यामार्गे वळवण्यात आलेली आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे, या अपघातामध्ये अनेक निरपराध लोकांना अपंगत्व आले काहींना तर आपला जीव गमवावा लागला आहे.

मागील वर्षी नितीन गडकरी यांनी औरंगाबाद मालेगाव रोड चे भूमिपूजन केले परंतु आजपर्यंत कार्यवाही शून्य आहे. फक्त निवडणूक आल्या कि भूमिपूजन करायचं निवडणूक जिकायची आणि नंतर रस्त्याकडे डोकूनही बघायचं नाही अशी अवस्था सरकारची असेल तर मग रस्ते सुधारणार तरी कधी असा घणाघात देखील यावेळी अभय पाटील यांनी केला.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले, अजय पाटील चिकटगावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भागिनाथ मगर, पं.स.सदस्य राजेंद्र मगर,शिऊरचे सरपंच नितीन चुडीवाल, लोणी खुर्द चे सरपंच रिखब पाटणी, वसंत जाधव, आनंद निकम, कृष्णा जाधव 
अकबर शेख, मिनीनाथ जाधवबाळासाहेब पवार, वसंत जाधव, अमोल निकम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top