"राष्ट्रवादी" च्या जिल्हाध्यक्षपदी अभय पा चिकटगावकर यांची लागणार वर्णी ?
शिऊर / प्रतिनिधी
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पद गेल्या 8 महिन्यापासून रिक्त आहे, राष्ट्रवादी काँग्रेस च्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदासाठी राज्यातील जिल्हानिहाय प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली, औरंगाबाद जिल्ह्यातून अभय कैलास पाटील चिकटगावकर, रंगनाथ काळे, कैलास पाटील गंगापूरकर आणि विलास चव्हाण यांची नवे अंतिम यादीमध्ये घेण्यात आलेले आहे या चार पैकीच एकाची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात येणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायाभरणी स्वर्गीय कैलास पाटील चिकटगावकर यांनी केली. ज्यावेळी पवार साहेबानी नवीन पक्षाची घोषणा केली तेव्हा  मराठवाड्यातून साहेबांसोबत जाणारे पहिले आमदार हे कैलास पाटील चिकटगवाकर होते. आमदार श्री भाऊसाहेब पाटील चिकटगवाकर यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर तालुक्यात अधिक लक्ष देता यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.आज पक्षाचा जिल्हा अध्यक्ष निवडीसाठी चाचपणी सुरु आहे सुरुवातीला आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली होती परंतु पक्षातील काही कार्यकर्ते व नेत्यांनी हे पद आमदार व्यक्तीस देण्यात येऊ नये अशी मागणी करून चव्हाण यांच्या नवस विरोध दर्शवला होता सद्धया 4 नावे चर्चेत आहे त्यामध्ये अभय पाटील चिकटगवाकर यांचेही नाव आहे. अभय पाटील हे तरुण असल्याने साहजिकच त्यांच्यासोबत तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. तालुक्यातील राजकारणात सक्रिय झाल्यापासून अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रम त्यांनी राबवले, पक्षाव्यतिरिक्त सर्वपक्षीय नेते मंडलीसोबत त्यांव्हे मैत्रीपूर्ण संबंध आहे हि त्यांची वेगळी ताकद आहे, औरंगाबाद जिल्ह्यात पक्षाला आलेली मरगळ दूर करून नक्कीच पक्षाला उंचावर नेण्याचं काम अभय पाटील करतील अशी आशा कार्यकर्त्यांना आहे,  याअगोदर त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष हे पद भूषविलेले आहे त्यामुळे त्यांचा जिल्ह्याचा राजकीय, सामाजिक, व भौगोलिक अभ्यास आहे त्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल.
जिल्हा अध्यक्षाची निवड करताना माजी आमदार  कै. कैलास पाटील चिकटगावकर यांनी राष्ट्रवादी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा पक्षाला नक्कीच विचार करावा लागेल अशी अभय पाटील यांच्या समर्थकांना आशा आहे.

जिल्हाध्यक्ष पदाचा पार्श्वभूमीवर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावून विचारणा करण्यात आलि याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण, आ विक्रम काळे, माजी आ किशोर काळे, अभय पाटील चिकटगावकर, रंगनाथ काळे, कादिर मौलाना,कैलास पाटील गंगापूरकर, विलास चव्हाण माजी आ संजय वाघचौरे, मनमोहनसिंग ओबेराय, विजय साळवे आदी उपस्थित होते.


पक्षाने संधी दिल्यास नक्कीच पक्षाला नवीन रूप देण्याचं काम करू, युवा पिढी पक्षासोबत जोडून पक्ष संगठन वाढवून पक्षाला जिल्ह्यात चांगले दिवस आणू.
-अभय पाटील चिकटगावकर
 
Top