रावणाने स्थापलेले शिऊर येथील रावणेश्वर मंदिर
खोलेश्वर,माणकेश्वर, नर्मदेश्वर, शिवेश्वर महादेव मंदिर येथेही भाविकांची गर्दी
श्रावण सोमवार विशेष
सौरभ लाखे / शिऊर
शिऊर या गावास अध्यात्मिक ,ऐतिहासिक, पौराणिक महत्व असून शिऊर या गावाचे प्राचीन नाव शिवपुरी असे होते शिवपुरी म्हणजे अनेक शिवाची मंदिरे असलेल्या या गावात हेमांडपंथी रावणेश्वर मंदिर, खोलेश्वर, मानकेश्वर, नर्मदेश्वर, पितळी महादेव आदी मंदिरांचा समावेश आहे. अपभ्रंशाने शिवपुरीचे नाव शिऊर असे झाले आहे. या गावात सर्वात कुतूहलाचा विषय म्हणजे रावणाने स्थापलेले रावणेश्वर मंदिर.......
रावण हा शिवभक्त होता महादेवाने आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी रावणाने या स्थानावर अनुष्ठान केले.रावणाला अमरत्व मिळवायचे होते यासाठी रावणाने शिऊर येथे तपशर्या करून आपली नऊ शिरे अर्पण केली.द्वापार युगात ८ लाख ६४ हजार वर्ष गेली त्यापूर्वी त्रेतायुगाच्या शेवटी रावण शिऊर येथे आला होता येथे तपशर्या करून करून आपले नऊ शिरकमळे महादेवाला अर्पण करताच स्वयंभू देव प्रकट झाले आपण माझे नाव धारण करून येथे वास्तव्य करावे असे सांगत देवाने तथास्तु म्हणत ‘रावणेश्वर’ रूप झाले.रावणाने स्वतः या ठिकाणी एका रात्रीत हे मंदिर उभारले रावणाने बांधलेले महाराष्ट्रातील हे असे एकमेव मंदिर आहे.
अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.हे मंदिर हेमांडपंथी असून वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरासारखी या मंदिराची बांधणी आहे.मंदिराला लाकडी सागवानी सभामंडप असून मंदिराचे बांधकाम हे संपूर्ण दगडी व उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना आहे. शिवभक्त रावणाने मंदिर उभारलेले असल्याने या मंदिराला अन्यन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. महाशिवरात्र,श्रावण महिन्यात या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.मंदिराचा दैनंदिन पूजाविधि व व्यवस्थापन मंदिराचे अध्यक्ष वे.शा.सं बाळासाहेब मुळे हे सांभाळतात.
मंदिर परिसराचा कायापालट
या प्राचीन हेमांडपंथी मंदिर परिसराचा विकास होत असून व्यवस्थापनासह लोकप्रतिनिधींच्या दातृत्वामुळे पेव्हर ब्लॉक,बाकडे,पाणीपुरवठा आदीसोबतच मंदिर परिसर शुशोभित होत आहे.