जिरी मनोली गट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लहानुबाई शिंदे तर उपसरपंचपदी उषा सताळकर बिनविरोध

शिऊर । वैजापूर तालुक्यातील जिरी मनोली गट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लहानुबाई कारभारी शिंदे तर उषा रवींद्र सताळकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ( दि २४ ) रोजी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यलयात झालेल्या निवड कार्यक्रमात अध्यासी अधिकारी म्हणून अजहर शेख उपस्थित होते. प्रत्येकी अडीच वर्षाच्या ठरलेल्या सूत्रानुसार दि १७ सप्टेंबर रोजी रतन चव्हाण यांनी सरपंचपदाचा तर वच्छलाबाई भवर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. यावेळी ग्रापंचायत सदस्य रतन चव्हाण, कैलास सूर्यवंशी, शैला भालकर, लताबाई सूर्यवंशी, वच्छलाबाई भवर, सदाशिव सूर्यवंशी, पोलीस पाटील कारभारी शिंदे यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित सरपंच लहानुबाई शिंदे व उपसरपंच उषा सताळकर यांच्या निवडीबद्दल आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकार, माजी जि प सदस्य अभय पाटील चिकटगावकार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले, माजी उपसभापती भागीनाथ मगर, पं.स.सदस्य योगिता आनंद निकम, राजेंद्र मगर, बाळासाहेब शिंदेसह ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.

फोटो:
 
Top