खराब रस्त्याने घेतला नवजात शिशूचा बळी

खराब रस्त्याने घेतला नवजात शिशूचा बळीतर रिक्षाचालकाच्या सतर्कतेने वाचला महिलेचा जिव

दादासाहेब तुपे/ गारज
 वैजापुर तालूक्यातील जांबरखेडा येथे मध्य प्रदेश मधून मोलमजूरी करण्यासाठी आलेल्या  सहा महिने गरोदर महिलेला पोटात दुखत असल्याने  पती उपचारासाठी   देवगावरंगारी येथिल घाटी रूग्नालयात नेत असतांना  गारज ते देवगावरंगारी या सात किलोमीटरवर असलेल्या  रस्त्यावरील खड्ड्यामुळे आदळा बसल्याने पोटात दुखू लागल्याने या महिलेची रिक्षातच प्रसुती झाली सहाव्या महिन्यात प्रसुती झाल्याने  उघड्यावरच  त्यात नवजात शिशुला उपचार न मिळाल्यामुळे नवजात शिशू दगावला तर रिक्षाचालकाच्या  सतर्कतेने महिलेचे प्राण वाचल्याची घटना आज ३१ऑक्टोबर रोजी   बारा वाजता दुपारी घडली




➡ औरंगाबाद ते मालेगाव या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर असल्याने रस्ता शोधत  वाहनचालकांना मोठी सर्कस करावी लागत आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने अनेकदा याठिकाणी महाविद्यालयीन युवती,प्रवाशी आपल्या दुचाकी गाडीवरून  गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरवस्था होत असते. त्यामुळे अपोआपच मोठी वाहतूक कोंडी होवून अपघाताला निमंत्रण मिळते. या रस्त्याशी नागरिकांना रोजच सामना करावा लागत असतानाही संबधित विभाग केवळ या रस्त्याची नावाला मलमपट्टी करून रस्ता दुरुस्त करतात. मात्र, अल्पावधीतच हा रस्ता उखडत असल्याने नागरिकांसह वाहनचालकही वैतागले आहेत.

➡ औरंगाबाद नाशिका मार्ग हा अत्यंत  वर्दळीचा  असतांना  धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गच्या दोन महिने  वाहतूकीची भर पडली होती त्यामुळे  आणि सर्वांत महत्त्वाचा  महामार्गावरील या या अवजड वाहतुकीने या मार्गावर मोठ मोठी खड्डे पडली आहेत  महामार्ग चौपदरीकरणाचा विषयही गेली दहा वर्षापासुन चर्चेत आहे. आजही तो प्रश्न मिटलेला नाही. त्यातच गेल्या काही वर्षात महामार्गावर अवजड वाहतुकीचा ताण अधिक वाढला आहे. लहान वाहनांची संख्याही वाढल्याने महामार्ग कायम 'बिझी' असतो  लोकप्रतीनिने व बांधकाम विभागाने लवकरात लवकर यावर तोडगा  न  काढल्यास या मार्गावर मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही

➡ औरंगाबाद ते शिऊर बंगला या पन्नास कि.मी.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झालेले असल्याने दोन महिन्यात विस जनांचा या रस्त्यावर जिव गेला आहे व शेकडोंनी अपंगत्व आले माजी जिल्हा परिषद सदस्य अभय पाटील चिकटगावकर यांनी   गारज येथे आज दि. १६ रोजी भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर असलेले गड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे .परंतु अजूनही काम पुर्ण न होऊ शकल्यामुळे  वाहतुकीच्या कोंडी  सोबत रोडची अत्यंत  दयनीय अवस्था  कायम आहे .

➡ प्रतिक्रिया :-
१) सकाळी उठल्यापासुन पत्नीला पोटात दुखणे चालु होते त्यामुळे मी सुरवातीला तिला गारज येथे उपचारासाठी दाखल झाले व नंतर देवगावरंगारी च्या घाटी रूग्नालयात नेत असतांनाच खराब रस्त्यामुळे देवगावरंगारी ला नाही पोहचू शकलो व जांबरखेडा फाट्यावर तिची प्रसुती झाली व मुलगाही दगावला
:-   क्रुष्णा मोर महिलेचा पती


२)-खराब रस्त्यामुळे व खड्यात बसलेल्या धक्क्यामुळेच बाळ वेळेआधीच बाहेर पडले व  हि प्रसुती झाली जि प्रसुती नऊ महिन्यांत होणार होती ति सहाव्या महिन्यात झाली नैसर्गिक प्रसुती झाली असतीतर हे बाळ दगावले नसते
:- प्रफुल्ल गायकवाड वैद्यकीय अधिकारी, देवगावरंगारी प्राथमिक आरोग्य केंद्र


३) -या महिलेची खुपच  हाल  होत असल्याने लवकरात लवकर दवाखान्यात पोहचवणे गरजेचे होते त्यामुळे खुप प्रयत्न केले खराब रस्त्यामुळे व ट्राफिक मुळे या महिलेची माझ्या रिक्षातच प्रसुती झाली उपचाराअभावी बाळ दगावले परंतु महिलेला वाचवण्यासाठी लवकर गाडी दवाखान्यात घेऊन गेलो व या महिलेचे प्राण वाचले
:- अंकुश साळूंके रिक्षाचालक गारज
 
Top